Posts

द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड: ऑग मेंडीनो

Image
 द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड: ऑग मैन्डिंनो.  द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड हे ऑग मेंडीनो या जगप्रसिद्ध लेखकाचे गाजलेले पुस्तक. या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन कोटींच्या वर पुस्तक विक्री झाली आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा.पुष्पा ठक्कर यांनी केला आहे . साकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. फक्त 112 पृष्ठ संख्या असणारे हे पुस्तक. शीर्षकावरून एखादे विक्री कलेच्या संदर्भातील पुस्तक वाटत असले तरी हे पुस्तक जीवन जगण्याचे आणि ते अत्यंत समृद्धपणे जगण्याचे अद्भुत तत्त्वज्ञान वाचकांना सांगते. या पुस्तकात सांगितलेल्या दहा सूत्रांचा अवलंब केल्यास तुम्ही सुद्धा या पुस्तकाच्या नायका प्रमाणे ईश्वरी संपत्तीचा भागीदार होऊन प्रचंड संपत्तीचे मालक होऊ शकता पण तेवढा विश्वास आणि तयारी मात्र हवी.या पुस्तका मागील लेखकाची भूमिका अशी आहे की आपण सर्वजण सेल्समन आहोत आणि आपण सर्वच जण कुठल्यातरी गोष्टीची विक्री करत असतो. कुणी बुद्धी विकतो, कुणी श्रम, कोणी कौशल्य ,तर कुणी ज्ञान. यापैकी काहीही विकून अर्थार्जन करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. या गोष्टी विकत असताना चां...

आपल्या अस्तित्वाचे स्वरूप: जे. कृष्णमूर्ती

Image
 आपल्या अस्तित्वाचे स्वरूप:जे. कृष्णमूर्ती.  कृष्णमूर्ती अध्ययन केंद्र सह्याद्री, पुणे, कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे 2002 मध्ये प्रकाशित फक्त 40 रुपये किंमत असलेली 40 पृष्ठांची ही एक छोटेखानी पुस्तिका. प्रा. कल्याणी किशोर यांनी याचा मराठी अनुवाद केलेला आहे.जे.कृष्णमूर्ती यांनी कित्येक वर्षे अमेरिकेमध्ये अनेक जाहीर प्रवचने दिली पण वॉशिंग्टन डी.सी .मध्ये ते कधीही बोलले नव्हते. 1985 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी वॉशिंग्टन डी.सी .मध्ये दोन जाहीर प्रवचने दिली. अतिशय विद्वान आणि गंभीर प्रवृत्तीच्या अभ्यासू श्रोत्यांसमोर दिलेली ही दोन प्रवचने म्हणजे थोडक्यात त्यांच्या शिकवणीचा सारच होय .ही  प्रवचने दिल्यानंतर अवघ्या दहा महिन्यानंतर कृष्णजींचा मृत्यू झाला. यातील पहिल्या प्रवचनाचे शीर्षक आहे" वर्तमाना मध्ये समग्र काळ आहे". या प्रवचनाच्या अगदी सुरुवातीलाच ते स्पष्ट करतात की या व्याख्यानमालेचे प्रयोजन मनोरंजन नव्हे तसेच कुठल्याही विचारधारेचा प्रसार करणे नव्हे. जन्माच्या क्षणापासून ते मृत्यूपर्यंतच्या आपल्या समग्र अस्तित्वासंबंधी आपण बोलणार आहोत .जन्मापासून मृत्यूपर...

तेरा संवाद: जे कृष्णमूर्ती.

Image
 विविध विषयांवर   जे कृष्णमूर्ती या जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञांच्या जगातील विविध ठिकाणांच्या लोकांशी झालेल्या संवादांमधून निवडक तेरा संवाद असलेली चंद्रकला प्रकाशन या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित झालेली ही पुस्तिका .अगदी छोटीशी असली तरी त्यामधील त्यामधील संवाद खरोखरच वाचकांना अंतर्मुख करून स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची आणि त्यात परिवर्तन घडवून आणण्याची एक नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करून देणारे आहेत. .जे.कृष्णमूर्ती यांनी सानेन, हॉलंड या ठिकाणी 1968 मध्ये लोकांशी साधलेले निवडक पाच संवाद या पुस्तकाच्या सुरुवातीला घेतले आहेत आणि त्यांचे आणि पुढील आठ संवाद त्यांच्याबरोबर काही लोकांनी केलेल्या चर्चांचे conversations या मूळ इंग्रजी पुस्तकातून घेतले आहेत.या पुस्तकातील पहिला संवाद कृष्णमूर्ती यांनी सानेन येथील त्यांना भेटायला आलेल्या तरुण मुलांच्या एका गटाशी केलेला आहे.त्या तरुण मुलांना असा प्रश्न पडलेला आहे की या जगात जिकडे पहावे तिकडे प्रचंड अ व्यवस्था, द्वेष, तिरस्कार,  यांचेच साम्राज्य आहे आणि समाज पातळीवर ,कुटुंब पातळीवर, तसेच राष्ट्रीय व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीव...

सहज:धनंजय जोशी.

Image
 फार पूर्वी दैनिक लोकमत च्या अक्षर रंग पुरवणी मध्ये धनंजय जोशी यांचे झेन तत्वज्ञाना वरील एक सुंदर सदर प्रकाशित व्हायचे . प्रत्येक भाग झेन नुसार जीवन सहज कसे जगता येईल याचा वस्तु पाठ असे. त्या सदराचे पूर्ण भाग मी वाचले होते. मला आठवते की मी लेखक धनंजय जोशी यांना मेल केला होता आणि त्यांचे पुस्तक मी प्रकाशित करण्यास तयार आहे असे सांगितले होते. त्यांनी मला उत्तर ही दिले होते. २०२० मध्ये रोहन प्रकाशनाने या लेखांचे 'सहज ' हे नितांत सुंदर पुस्तक प्रकाशित केले आहे. लहान लहान लेखां  मधून खूप मोठे जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारे हे पुस्तक आहे. लेखक धनंजय जोशी अमेरिकेमधील शिकागो येथील मोटोरोला आणि रॉकवेल यासारख्या जगद्विख्यात कंपन्यांमध्ये काम करत असताना  त्यांची काही संत पुरुषांशी भेट झाली. काही वर्षे ते शिकागो येथील विवेकानंद केंद्रा तील स्वामी भाष्या नंद यांच्या सोबत राहिले. त्यानंतर सान सा नीम हे झेन गुरु त्यांना भेटले. पहिल्या भेटी मध्ये त्यांनी झेन काय आहे हे स्पष्ट केले.. "झेन खूप सोपे आहे, सहज आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हा खावं, जेव्हा झोप येईल तेव्हा झोपाव. समोर भुकेला मनु.ष्य...

दिव्य स्पर्शी:धनंजय देशपांडे.

Image
 पुस्तक परिचय या वेगळ्या वाटे वरील पुस्तकां चा परिचय करून देणाऱ्या माझ्या ब्लॉग वरील हा दुसरा लेख. पहिल्या लेखाला आपण खूप प्रतिसाद दिला. हा दुसरा पुस्तक परिचय ही तुम्हांला नक्की पसंद येइल. माजी न्या. धनंजय देशपांडे यांनी लिहिलेले हे अद्भुत पुस्तक साधारण २० वर्षांपूर्वी माझ्या हातात पडले. तेव्हा पासून आजवर या पुस्तका ने मनावर केलेली जादू कमी झाली नाही. प्रसाद प्र काशना ने ने काढ़लेले हे पुस्तक वाचकां ना संमोहित करून टाकते. राम भोसले या अवलिया व्यक्ति च्या अद्भूत जीवन प्रवासाची माहिती या पुस्तका तून आपल्याला वाचायला भेटते. राम भोसले यांचा जन्म १९१८ चा. त्यांचे वडील कृष्ण राव भोसले हे ब्रिटिश सरकार मध्ये जनरल होते. वडिल अकाली गेल्यावर आई सोबत काही वर्षे त्यांना मामा कड़े राहावे लागले. पण् जन्मजात क्रांतिकारी स्वभावाचे राम भोसले घरातून निघून गेले. त्यांना कमी वयात बरीच व्यसने लागली होती. धूम्र पान, गांजा, चरस, इ. काही दिवस त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्या संघटने मध्ये काम केले. पकड वारंट जारी झाल्या वर ते हिमालया मध्ये निघून गेले. बरेच दिवस उपाशी राहिल्या नंतर त्यांना एक सिद्ध यो...

सिद्धार्थ:हर्मन हेसे.

Image
 वाचलेल्या सुंदर पुस्तकां चा परिचय करून देणारा हा ब्लॉग काल सुरू केला. या मालिके तील हे पाहिले पुस्तक. हरमन हेसे या नोबेल पुरस्कार विजेत्या लेखका चे हे नववे पुस्तक. मूळ पुस्तक जर्मन भाषेत प्रकाशित झाले १९२२ मध्ये. १९५१ मध्ये अमेरिकेत इंग्रजी अनुवाद झाला ज्याला १९६१ मध्ये प्रसिद्धी मिळण्यास सुरूवात झाली. असे म्हणतात कि प्रत्येक पुस्तक आपले नशीब घेऊन येते. या पुस्तका चे असेच झाले. त्याची लोकप्रियता इतकी झाली की जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या पुस्तकां मध्ये त्याची गणना होते. जगातील विविध भाषां मध्ये या कादंबरी चा अनुवाद झाला. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषां मध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.  सिद्धार्थ या नावा वरून गौतम बुद्धाच्या जीवना वर आधारित कादंबरी आहे असे वाटते. मलाही तसेच वाटले होते. पण या कादंबरी चा नायक असलेला सिद्धार्थ हा एक बुद्धाचा सम कालीन युवक आहे. त्याचे वडिल वेद शास्त्र संपन्न पंडित आहेत. सिद्धार्थ च्या मनात स्वतः चा शोध घेण्याची तीव्र इच्छा आहे. वडीलां चा विरोध असला तरी तो हट्ट करून बसतो आणि एके दिवशी घर सोडून निघून जातो. त्याचा जीवलग मित्र गोविंदा त्याच्या सोबत या...

पुस्तके... वाचलेली.. वाचावी अशी..

Image
 गेल्या 45 ते 50 वर्षां मध्ये वाचलेल्या हजारो पुस्तका मधून आवड लेल्या काही सुंदर पुस्तकां चा परिचय वाचकां ना करून द्यावा यासाठी एखादा ब्लॉग लिहावा असे खूप दिवसा पासून ठरवले होते.  आज सुरुवात केली. दोन दिवसाला एक पुस्तक या प्रमाणे पुस्तकां चा परिचय करून द्यावा असा विचार आहे.  माझ्या सारख्या पुस्तकां वर प्रेम करणाऱ्या वाचकां साठी हा ब्लॉग सुरू करीत आहे.  हा प्रयास सर्व पुस्तकां वर प्रेम करणाऱ्या मित्रां ना नक्की पसंत येईल आणि ते मला नक्की प्रतिसाद देतील आणि हा ब्लॉग नियमित वाचून आपल्या प्रतिक्रिया देतील आणि सुधारणा करण्यासाठी सूचना देतील ही अपेक्षा आहे.  आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया यांची प्रतिक्षा आहे.                                                 महेंद्र देशमुख.                                                  ...