सहज:धनंजय जोशी.
फार पूर्वी दैनिक लोकमत च्या अक्षर रंग पुरवणी मध्ये धनंजय जोशी यांचे झेन तत्वज्ञाना वरील एक सुंदर सदर प्रकाशित व्हायचे . प्रत्येक भाग झेन नुसार जीवन सहज कसे जगता येईल याचा वस्तु पाठ असे. त्या सदराचे पूर्ण भाग मी वाचले होते. मला आठवते की मी लेखक धनंजय जोशी यांना मेल केला होता आणि त्यांचे पुस्तक मी प्रकाशित करण्यास तयार आहे असे सांगितले होते. त्यांनी मला उत्तर ही दिले होते. २०२० मध्ये रोहन प्रकाशनाने या लेखांचे 'सहज ' हे नितांत सुंदर पुस्तक प्रकाशित केले आहे. लहान लहान लेखां मधून खूप मोठे जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारे हे पुस्तक आहे. लेखक धनंजय जोशी अमेरिकेमधील शिकागो येथील मोटोरोला आणि रॉकवेल यासारख्या जगद्विख्यात कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांची काही संत पुरुषांशी भेट झाली. काही वर्षे ते शिकागो येथील विवेकानंद केंद्रा तील स्वामी भाष्या नंद यांच्या सोबत राहिले. त्यानंतर सान सा नीम हे झेन गुरु त्यांना भेटले. पहिल्या भेटी मध्ये त्यांनी झेन काय आहे हे स्पष्ट केले.. "झेन खूप सोपे आहे, सहज आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हा खावं, जेव्हा झोप येईल तेव्हा झोपाव. समोर भुकेला मनु.ष्य असेल, तेव्हा त्याला खायला द्यावे, आयुष्य म्हणजे आरसा. तुम्ही जे दाखवाल, ते दिसेल्. फक्त तुमच्या मध्ये बघण्या चे धैर्य हवे.. 'त्यांनी लेखकाच्या घरी ध्यान केंद्र सुरु केले. तसे पहाता या पुस्तका चा परिचय करून घेणे ही माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट आहे कारण या पुस्तकातील प्रत्येक वाक्य महत्त्वाचे आहे. तरी मला विशेष करून आवडली अशी काही वाक्य आणि प्रेरक प्रसंग मांडण्याचा प्रयत्न करतो. सान सा नीम यांचे एक आवडते वाक्य होते पुट इट डाउन, खाली ठेवा..तुमचे विचार, तुमच्या चिंता, तुमचे राग, लोभ, तुमची स्थिति.. सर्व काही. खाली ठेवणे म्हणजे सोडून देणे. Only this हा मंत्र लक्षात ठेवून जगले तर मनात गोंधळ होत नाही. समोर असलेले काम पूर्ण करायचे आणि त्यानंतर दुसऱ्या कामाचा विचार करायचा. दुःखापासून मुक्ती मिळणं म्हणजे काय ? मिया जावा नावाचा एक गुरु म्हणतो दुःखा पासून मुक्ती मिळवण्याआधी त्याला मिठी मारा! ज्या गोष्टींपासून आपल्याला सुटका हवी त्या गोष्टीची आपली ओळख तर हवी! या पुस्तकात दिलेल्या तक्रार साधना आणि नापसंद साधना या दोन साधना तर खरोखर अनुभवण्यासारख्याच आहेत. झेन साधका ला ध्यान करताना डु लकी लागली की झेन मास्टर त्याला छड़ी मारतो आणि त्यानंतर तो साधक आणि झेन मास्टर दोघे एकमेकांना नमस्कार करतात आणि साधक म्हणतो थैंक्स फॉर यौर टीचिंग. आपल्या मनात अनेक विचार येत असतात त्यांचं काय करायचं? लेखकाचे गुरु सांगतात त्यांचे स्वागत करा आणि त्यांना सांगा या ,माझ्या मनाचे दार उघडे आहे ,पण त्यांना हे सांगा की इथे चहा नाही मिळणार चहा साठी दुसरीकडे कुठेतरी जा. अजान सुबीन हे गुरु म्हणायचे तुमची दुःख तुम्हाला सोसावीच लाग तील.मला जर दोन चमचे मीठ खावेच लागणार असेल तर तुमच्या पुढे दोन मार्ग आहेत तर खारट खारट म्हणून ओरडणे. किंवा तेच दोन चमचे मीठ दहा ग्लास पाण्यामध्ये मिसळून पिणे ज्यामुळे त्याचा खारटपणा कमी होऊ शकेल. तुमची साधना हेच ते पाणी होय. एक शिष्य गुरुला विचारतो मास्टर जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग कोणता? गुरु उत्तर देतो, तुझ्या घरासमोरून जाणारा रस्ता. साधनेच्या कॉम्प्युटर वरील सर्वात चांगले बटन कुठले? Delete चे. हे वाक्य लक्षात ठेवण्या सारखे आहे. लहान लहान असे ६७ लेख या पुस्तकात आहेत. खूप काही आहे. त्या करिता हे पुस्तक नक्की वाचा. लेखन मर्यादा आहे, इथेच थांबतो.
महेंद्र देशमुख. ९०९६६९४२००.

Comments
Post a Comment