सिद्धार्थ:हर्मन हेसे.
वाचलेल्या सुंदर पुस्तकां चा परिचय करून देणारा हा ब्लॉग काल सुरू केला. या मालिके तील हे पाहिले पुस्तक. हरमन हेसे या नोबेल पुरस्कार विजेत्या लेखका चे हे नववे पुस्तक. मूळ पुस्तक जर्मन भाषेत प्रकाशित झाले १९२२ मध्ये. १९५१ मध्ये अमेरिकेत इंग्रजी अनुवाद झाला ज्याला १९६१ मध्ये प्रसिद्धी मिळण्यास सुरूवात झाली. असे म्हणतात कि प्रत्येक पुस्तक आपले नशीब घेऊन येते. या पुस्तका चे असेच झाले. त्याची लोकप्रियता इतकी झाली की जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या पुस्तकां मध्ये त्याची गणना होते. जगातील विविध भाषां मध्ये या कादंबरी चा अनुवाद झाला. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषां मध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.
सिद्धार्थ या नावा वरून गौतम बुद्धाच्या जीवना वर आधारित कादंबरी आहे असे वाटते. मलाही तसेच वाटले होते. पण या कादंबरी चा नायक असलेला सिद्धार्थ हा एक बुद्धाचा सम कालीन युवक आहे. त्याचे वडिल वेद शास्त्र संपन्न पंडित आहेत. सिद्धार्थ च्या मनात स्वतः चा शोध घेण्याची तीव्र इच्छा आहे. वडीलां चा विरोध असला तरी तो हट्ट करून बसतो आणि एके दिवशी घर सोडून निघून जातो. त्याचा जीवलग मित्र गोविंदा त्याच्या सोबत या अज्ञाता च्या प्रवासाला निघतो. रस्त्यात एका ठिकाणी गौतम बुद्धा ची भेट होते. गोविंदा बुद्धा च्या व्यक्ति मत्वाने प्रभावित होऊन दीक्षा घेवून भिक्षू होतो. बुद्धाच्या ज्ञानाने प्रभावित होऊनही सिद्धार्थ बुद्धाला सांगतो कि मला स्वतः चा शोध घ्यायचा आहे आणि गोविंदला तिथेच सोडून तो पुढे जातो. आत्म शोधा च्या या प्रवासा मध्ये त्याची भेट एका अत्यंत सुंदर अशा नर्तकी शी होते जी त्याच्या प्रेमात पडते. तिच्या प्रेमा मध्ये आकंठ बुडालेला सिद्धार्थ आता तिच्या मदतीने एक कोट्या धीश व्यापारी बनतो. सर्व सुखे मिळूनही अंतरयामी कुठेतरी आत्म शोध घेण्याची इच्छा असते जी काही घटनां नंतर पुन्हा जागृत होते. त्या घटना काय होत्या हे पुस्तका मध्येच वाचलेले चांगले. अशा या काही वर्षे स्खलन शील झालेल्या या युवका ला ज्ञान प्राप्ती होते ती एका नदी कडून तीही एका अडानी नाव चालक असलेल्या व्यक्ति कडून. संपूर्ण कादंबरी काव्या त्मक शैली मध्ये लिहिलेली आहे जी नितांत सुंदर आहे. या कादंबरी वर आधारित एक हिंदी चित्रपट ७० च्या दशकात आला ज्यात सिद्धार्थ ची भूमिका शशि कपूर यांनी तर त्याच्या प्रेमिके ची भूमिका सुप्रसीद्ध अभिनेत्री सिम्मी गरेवाल यांनी केली आहे. ज्यांना सिनेमाचे वेड आहे, वाचनात रस नसेल ते आणि वाचक ही पुस्तक वाचून झाल्या नंतर हा सिनेमा पाहू शकतील. आत्म बोध, आत्म शोध, स्खलन, संसार, प्रेम, वासना, भोग, आणि पुन्हा एकदा सर्व भोगून झाल्यावर येणारी एक विरक्ति या सर्वांचे अद्भूत मिश्रण आहे ही कादंबरी. नोबेल पुरस्कार प्राप्त ही कादंबरी नक्की वाचा.
या ब्लॉग मधे याच पुस्तका चा परिचय मी का करून देतोय मलाही माहित नाही. कदाचित ती अन्तः करणा मध्ये कुठे तरी खोल रुजुन बसलेली असून या निमित्ता ने पृष्ठ भागा वर आली , असेही असू शकते, नाही का?
महेंद्र देशमुख. ९०९६६९४२००.

Comments
Post a Comment