दिव्य स्पर्शी:धनंजय देशपांडे.
पुस्तक परिचय या वेगळ्या वाटे वरील पुस्तकां चा परिचय करून देणाऱ्या माझ्या ब्लॉग वरील हा दुसरा लेख. पहिल्या लेखाला आपण खूप प्रतिसाद दिला. हा दुसरा पुस्तक परिचय ही तुम्हांला नक्की पसंद येइल. माजी न्या. धनंजय देशपांडे यांनी लिहिलेले हे अद्भुत पुस्तक साधारण २० वर्षांपूर्वी माझ्या हातात पडले. तेव्हा पासून आजवर या पुस्तका ने मनावर केलेली जादू कमी झाली नाही. प्रसाद प्र काशना ने ने काढ़लेले हे पुस्तक वाचकां ना संमोहित करून टाकते. राम भोसले या अवलिया व्यक्ति च्या अद्भूत जीवन प्रवासाची माहिती या पुस्तका तून आपल्याला वाचायला भेटते. राम भोसले यांचा जन्म १९१८ चा. त्यांचे वडील कृष्ण राव भोसले हे ब्रिटिश सरकार मध्ये जनरल होते. वडिल अकाली गेल्यावर आई सोबत काही वर्षे त्यांना मामा कड़े राहावे लागले. पण् जन्मजात क्रांतिकारी स्वभावाचे राम भोसले घरातून निघून गेले. त्यांना कमी वयात बरीच व्यसने लागली होती. धूम्र पान, गांजा, चरस, इ. काही दिवस त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्या संघटने मध्ये काम केले. पकड वारंट जारी झाल्या वर ते हिमालया मध्ये निघून गेले. बरेच दिवस उपाशी राहिल्या नंतर त्यांना एक सिद्ध योगी भेटले ज्यांनी त्यांना जे हवे ते मागायला सांगितले. राम भोसले यांना ते खोटे वाटले आणि त्यांनी त्या उंचीवर जे भेटूच् शकत नाहीत अशा काही वस्तू देण्यास सांगितले. त्या भेटल्या वर त्यांची खात्री झाली की हे कुणी सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्या सोबत बरेच दिवस राहिल्या नंतर त्या योग्याने त्यांना दिव्य मसाज पद्धती ची दीक्षा दिली. त्या नंतर ही त्यांना स्वामी नित्या नंद, महा अवतार बाबाजी इ. दिव्य पुरुषांशी भेटीचा योग आला. त्यानंतर त्या योगी पुरुषाने दिलेल्या दिव्य मसाज विद्येचा वापर करून त्यांनी जे काम केले ते अविश्वस्निय असे आहे. त्यांच्या हातात जादू होती जिच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना वेदना मुक्त केले. त्यांचे उपचार घेणाऱ्या लोकांची नावे वाचली की विश्वास बसत नाही कि हे लोक खरेच त्यांच्या कडून उपचार घेत असतील. चर्चिल, हिटलर, महात्मा गाँधी, ओशो, इंग्लैंड ची महारानी एलिजाबेथ, शंकर महाराज, लॉर्ड माउंटबेटन, लेडी माउंट बेटन, इ. काही नावे उदाहरणा साठी सांगू शकतो. मी जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचले तेव्हा मला यातील खूप गोष्टी अतिशयोक्ति पूर्ण आहेत असे वाटले. पण शेवट च्या पाना वर परिशिष्टा मध्ये या सर्व व्यक्ति ज्यांनी राम भोसले या व्यक्ति कडून उपचार घेतले होते त्यांच्या लेटर हेड वर स्वतः च्या हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रति किया आणि अनुभव वाचून हे खोटे नसल्याचे समजते. अशा या दिव्य शक्ति असलेल्या राम भोसले यांचे निधन २०१५ साली झाले. शेवट च्या दिवसात त्यांची दृष्टि गेली असूनही ते रुग्णा वर उपचार करीत होते. प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला मेहता यांच्या कड़े ते राहत असत.
काही हटके वाचायची इच्छा असल्यास हे पुस्तक नक्की वाचा. तुमच्या वाचन प्रवासास शुभेच्छा.
महेंद्र देशमुख. ९०९६६९४२००.

Comments
Post a Comment