तेरा संवाद: जे कृष्णमूर्ती.


  1.  विविध विषयांवर   जे कृष्णमूर्ती या जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञांच्या जगातील विविध ठिकाणांच्या लोकांशी झालेल्या संवादांमधून निवडक तेरा संवाद असलेली चंद्रकला प्रकाशन या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित झालेली ही पुस्तिका .अगदी छोटीशी असली तरी त्यामधील त्यामधील संवाद खरोखरच वाचकांना अंतर्मुख करून स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची आणि त्यात परिवर्तन घडवून आणण्याची एक नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करून देणारे आहेत. .जे.कृष्णमूर्ती यांनी सानेन, हॉलंड या ठिकाणी 1968 मध्ये लोकांशी साधलेले निवडक पाच संवाद या पुस्तकाच्या सुरुवातीला घेतले आहेत आणि त्यांचे आणि पुढील आठ संवाद त्यांच्याबरोबर काही लोकांनी केलेल्या चर्चांचे conversations या मूळ इंग्रजी पुस्तकातून घेतले आहेत.या पुस्तकातील पहिला संवाद कृष्णमूर्ती यांनी सानेन येथील त्यांना भेटायला आलेल्या तरुण मुलांच्या एका गटाशी केलेला आहे.त्या तरुण मुलांना असा प्रश्न पडलेला आहे की या जगात जिकडे पहावे तिकडे प्रचंड अ व्यवस्था, द्वेष, तिरस्कार,  यांचेच साम्राज्य आहे आणि समाज पातळीवर ,कुटुंब पातळीवर, तसेच राष्ट्रीय व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र या गोष्टींचे प्राबल्य वाढत चाललेले आहे आणि त्यातूनच आणि त्यांचे  आणि जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे चालू असलेली महाविनाशक युद्धे आणि त्यांचे विघातक परिणाम या सर्वांचा अंत शक्य आहे का? त्यात परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे का ?ते कशा पद्धतीने आणता येईल आणि परिवर्तनानंतरची परिस्थिती काय असेल या विषयावर चर्चा करीत असताना कृष्णमूर्ती सांगतात की परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रथम आपल्या संस्कार बद्धतेचा विनाश घडवून आणला पाहिजे आणि मनाची अक्रिय अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे तेव्हाच अशा प्रकारचे परिवर्तन घडवून आणणे शक्य होईल अन्यथा आपण क्रांतीनंतर पुन्हा विशिष्ट अशा नव्या विचारसरणीच्या बंधनात बांधले जाऊ आणि हे दृष्टचक्र असेच चालू राहील .दुसऱ्या संवादामध्ये एक 35 मधला सुंदर शरीर यष्टी असणारा तरुण कृष्णमूर्तींकडे येतो.त्याची समस्या अशी असते की 24 तास त्याच्या मनात कामवासनेचे विचार येत असतात.तो विवाहित असतो, त्याला एक लहान मुलगी ही असते.तो विवाह बाह्य संबंधांमध्ये अडकलेला नसतो पण प्रचंड काम वासने मुळे आपण आपल्या पत्नीचा छळ करीत आहोत की काय अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते  कृष्णमूर्ती नेहमीप्रमाणे या समस्येचे उत्तर देत असताना समस्येच्या खोलपर्यंत जातात आणि सांगतात की ही  गोष्ट नैसर्गिक आहे आणि समाजाच्या आणि कुटुंबाच्या संस्कारांमुळे कुठेतरी आपल्या मनात ही गोष्ट वाईट आहे असे गृहीत धरत असतो..कामवासनेला दडपून टाकने हा एकाअर्थी कृरतेचाच प्रकार आहे असे ते म्हणतात .कामवास ना ही निळ्या आभाळासारखी निरभ्र आणि स्वच्छ असू शकते,पण आपण समाजाने घातलेल्या बंधनांमुळे तिला निरभ्र आणि स्वच्छ ठेवलेले नाही.तिसऱ्या संवादामध्ये प्रीती आणि कर्म म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर देत असताना जे कृष्णमूर्ती म्हणतात की मुक्ती हेच माणसाच्या जीवनाचे अंतिम ध्येय असते आणि असावे .कशापासून मुक्ती तर सर्वच ज्ञात आणि अज्ञात गोष्टींपासून, सर्व बंधनांमधून आणि सर्व प्रकारच्या प्रश्नांपासूनही मुक्ती असावी.ते म्हणतात की मुक्ती प्रीती आणि कर्म हे एकमेकांशी निगडित असते.चौथा संवाद एका तरुण मुलाशी झालेला आहे ज्याला असा प्रश्न पडलेला आहे की आपल्या मनाचे बाह्यमन ,अंतर्मन ,चेतन मन , अवचेतन मन असे विभाग पडलेले असतात.मनाच्या या पृथक रूपांपेक्षा वेगळे असे संपूर्ण दर्शन होणे मानवाला शक्य आहे का? असल्यास कसे ?आपल्या दीर्घ संवादातून कृष्णमूर्तींनी  त्या मुलाला या प्रश्नाचे उत्तर उलगडून दाखवले आहे .दृश्य आणि पाहणारा दृष्टा हे दोन्ही एकच आहेत हे जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हाच अशा प्रकारचे समग्र दर्शन घडणे शक्य होईल.पाचवा संवाद एका तरुण आणि क्रांतिकारी विचारांच्या तरुणांच्या गटाशी आहे जे परिवर्तनाच्या विचारांनी भारावून गेले आहेत आणि त्यांना एक असे जग निर्माण करावयाचे आहे ज्यामध्ये द्वेष हिंसा, या गोष्टींना थारा नसेल आणि जिथे फक्त प्रेमाचे अधिराज्य असेल अशा जगाची निर्मिती शक्य आहे का ?यावर शेवटी कृष्णमूर्ती म्हणतात की या सर्व व्यवस्थेचे कारण आजच्या शिक्षण पद्धतीत आहे जी आपल्याला केवळ स्पर्धा आणि चढा ओढ शिकवते.यातूनच या सगळ्या गोष्टी निर्माण होतात .जर शिक्षणातून प्रीतीचा उदय झाला तर आपोआपच या सर्व गोष्टी नष्ट होण्यास मदत होईल .सहाव्या संवादातील व्यक्ती या रटाळ जीवनातून एकदम बाहेर पडण्याचा ,क्षणात बाहेर पडण्याचा एखादा मार्ग आहे का असे विचारतो.असे शक्य आहे का की एकदम या ऐल तीरावरून पलीकडच्या तीरावर जाता येईल ?एका प्राचीन मंदिरातील घंटा नादाने क्षणभर त्याला शांततेचा गव्हाण अनुभव प्राप्त झाला होता पण एका क्षणात  तो अनुभव संपला.असे का झाले असावे? कृष्णमूर्ती म्हणतात की एकदम या रटाळ जीवनातून शांततेच्या साम्राज्यात प्रवेश करणे अशक्य आहे.घंटा नादातून मिळालेला समाधीचा क्षणिक अनुभव पुन्हा मिळावा ही इच्छा पण करणे चुकीचे आहे.अधीर राहून अशी अवस्था प्राप्त होणार नाही तर शांततेला खूप मोठे धैर्य लागते .अशा धैर्यातूनच तुम्ही ज्याला पैल तिर म्हणता अशा प्रकारची शांतता प्राप्त होऊ शकेल.सातव्या संवादातील व्यक्ती जगात सर्वत्र धर्माच्या नावावर चालू असलेला भोंदूपणा, बुवाबाजी यासंदर्भात प्रश्न विचारतो आणि आत्मबोध नावाची गोष्ट खरोखर अस्तित्वात आहे का? असल्यास त्याचे स्वरूप काय आहे आणि आत्मबोध झाल्यानंतर नेमके काय घडून येते याबद्दल प्रश्न विचारतो आणि कृष्णमूर्तींनी  अतिशय सुंदर उत्तर त्या प्रश्नाला दिले आहे..आठव्या संवादामध्येही  प्रश्न विचारणारा व्यक्ती अशाच प्रकारचा प्रश्न विचारतो की एकदा व्यक्तीला शांततेची अवस्था प्राप्त झाली तर त्यानंतर त्याला काही पाहण्याची आवश्यकता असते का? त्याचे मग काय प्रयोजन असू शकेल? याचे उत्तर देताना नेहमीच्या पद्धतीने कृष्णमूर्ती यांनी शांतता म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय असते? ती आंतरिक शांतता असते की प्रयत्नपूर्वक मिळवलेली बाह्य स्वरूपाची शांतता असते असे एक एक पदर उलगडून, उलगडत जाऊन त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले आहे.नववा संवाद अशा व्यक्तीशी आहे जो व्यक्ती म्हणतो की मला बालपणापासूनच एक सवय आहे आणि ती सवय सोडण्याची मला इच्छा असूनही ती सवय मी सोडू शकत नाही आणि आपण ही सवय सोडू शकत नाही याचा मला खूप त्रास होत आहे .यावर कृष्णमूर्ती असे सांगतात की त्याने त्या सवयीचा विरोध करणे, प्रतिकार करणे सोडून द्यावे कारण तुम्ही जेवढा प्रतिकार करताल तेवढी ती सवय सुटण्यास कठीण होत जाईल.विरोध करण्यापेक्षा अलिप्तपणे त्या सवयीचे मूळ ,तिची कारणे यांच्याकडे पाहत जावे.हळूहळू ही सवय आपोआपच सुटून जाईल .दहाव्या संवादातील व्यक्तीची समस्या ही आहे की तो संबंधांमध्ये खूप आसक्त होतो आणि कालांतराने त्याला वाटू लागते की आपण त्या व्यक्तीशी वर अवलंबून राहत आहोत आणि मग त्या संबंधांपासून अलिप्त राहण्याचा तो प्रयत्न करतो.आणि मग त्याला एकाकीपणा वाटायला लागतो.या चक्रातून सुटका कशी होईल हा त्याचा प्रश्न आहे.कृष्णमूर्ती म्हणतात की हा एकटेपणा, हे शून्य हेच मानवी जीवनातील सत्य आहे आणि त्याच्यापासून पळून जाण्यासाठी आपण अनेक विरंगुळे शोधत असतो.मानवी संबंधातील गुंता हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.त्यामुळे या चक्रातून बाहेर पडावयाचे असेल तर प्रथम त्या एकाकीपणाकडे दृष्टा भावाने पाहणे शक्य झाले पाहिजे.अकराव्या संवादातील प्रश्न करता मानवी जीवनामध्ये द्वैत का आहे, व्यक्ती परत्वे प्रत्येक व्यक्तीमध्ये भेद का आहेत असा प्रश्न विचारतो आणि कृष्णमूर्ती त्याच्या प्रश्नाला दृष्टा आणि दृश्य म्हणजे काय ,दृष्टा वेगळा असतो का आणि तो पाहत असतो ते दृश्य वेगळे असते का ?अनुभव आणि अनुभव करता यांच्यात भेद असतो का असे समजावून सांगत हळूहळू त्याला या प्रश्नाच्या उत्तराकडे कसे नेतात हे वाचणे खूप मनोरंजक आहे.बाराव्या संवादातील प्रश्नकर्त्या मनुष्याला असा प्रश्न पडलेला आहे की अंतर्गत आणि बाह्य दोन्ही पातळीवर सतत चालू असणारा संघर्ष कसा थांबवू शकेल? कृष्णमूर्ती म्हणतात की कुठल्याही प्रकारचा संघर्ष मनाला विकृती आणत असतो .संघर्षामुळे स्पष्ट दर्शनाला अडथळा येतो .परस्पर विरुद्ध विचारांमुळे निर्माण होणारा हा संघर्ष थांबविण्यात थांबविण्याचे उपाय कृष्णमूर्ती सांगतात .शेवटच्या तेराव्या संवादातील व्यक्ती पाच वर्षांपासून कृष्णमूर्तींच्या सहवासात आहे.तो विचारतो की आपल्यासारख्या महान वटवृक्षाच्या सावलीखाली पाच वर्ष राहूनही मला कुठलीही अनुभूती आली नाही.माझ्यातच दोष आहे का? मी पूर्वी होतो तसाच चांगला होतो.इथे येऊन माझ्यात काहीही फरक पडला नाही अशी त्या व्यक्तीची भावना आहे.त्याला कृष्णमूर्तींनी उत्तर दिले आहे की अशी अवस्था जवळपास प्रत्येक क्षेत्रांमध्ये सर्वोच्च पदांवर पोहोचलेल्या माणसांची सुद्धा असते.प्रत्येकाला ऐहिक सुख मिळवून सुद्धा अशा प्रकारची एक पोकळी  जाणवतच असते आणि पुढे या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी काय करावे लागेल याचे ते मार्गदर्शन करतात . छोटे खाणी असूनही अतिशय सुंदर जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे हे पुस्तक आहे .या  व्यतिरिक्त कृष्णमूर्तींनी जे निसर्गाचे वर्णन केले आहे ते तर अप्रतिमच आहे.या ठिकाणी  शब्द मर्यादेमुळे ते सगळे सांगता येत नाही.बाकी सर्व त्या पुस्तकांमधूनच आपणास वाचावे लागेल.

                  महेंद्र देशमुख.9096694200.

Comments

Popular posts from this blog

द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड: ऑग मेंडीनो

पुस्तके... वाचलेली.. वाचावी अशी..

सिद्धार्थ:हर्मन हेसे.